Short News

बीसीसीआय अध्यक्षांच्या पगारात 20 लाखांची वाढ

बीसीसीआय अध्यक्षांच्या पगारात 20 लाखांची वाढ

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आता करोडपती झाले आहेत. बीसीसीआयने नुकतीच निवड समितीच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वर्षाला प्रसाद यांना एक कोटी रुपये मिळणार आहे. बीसीसीआयने सर्वच निवड समितींच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. यापूर्वी प्रसाद यांना वर्षाला 80 लाख रुपये मानधन मिळत होते, त्यांच्या मानधनात 20 लाखांची वाढ येणार आहे. 
'चांगली कथा असल्यास छोट्या भूमिकाही आवडतील'

'चांगली कथा असल्यास छोट्या भूमिकाही आवडतील'

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या मागील दोन चित्रपटात मात्र अगदी लहानशी भूमिका करताना दिसली. यावेळी तिने आपले मत मांडले आहे. आपण भूमिकेत वैविध्य शोधत आहे. तुमची भूमिका किती मोठी आहे यापेक्षा चित्रपटाचे कथानक दमदार असले पाहिजे. कथानक चांगली असल्यास छोट्या भूमिकासाठी आपल्याला हरकत नसल्याचे ऐश्वर्या एका कार्यक्रमात म्हणाली. 
यो-यो टेस्टमध्ये सरदार सिंगने दिली कोहलीला मात

यो-यो टेस्टमध्ये सरदार सिंगने दिली कोहलीला मात

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यो-यो टेस्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. यो-यो टेस्टमध्ये पास झाल्यावरच खेळाडूचे भारतीय टीममध्ये निवड व्हायचे दरवाजे उघडतात. क्रिकेटपटूनंतरही आता भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंगही यो-यो टेस्ट पास झाला आहे. सरदार सिंग फक्त यो-यो टेस्ट पासच झाला नाही तर त्याला विराट कोहलीपेक्षा जास्त मार्क मिळाले. खराब फिटनेसमुळे सरदार सिंगला टीममधून डच्चू देण्यात आला होता. 
चंकी पांडेची मुलगी करण जयसिंहला करतेय डेट ?

चंकी पांडेची मुलगी करण जयसिंहला करतेय डेट ?

करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनन्याच्या या पदार्पणाबरोबरच तिच्या अफेरबद्दलही चर्चा रंगताना दिसत आहे., अनन्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर मोनिका जयसिंह यांचा मुलगा करण जयसिंह याला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more