Short News

धबधब्याखाली भिजणाऱ्या धोनीचा स्लो मोशन व्हिडिओ पाहिला का ?

धबधब्याखाली भिजणाऱ्या धोनीचा स्लो मोशन व्हिडिओ पाहिला का ?

महेंद्रसिंग धोनीने गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी धोनी नेहमी क्रियाशील असतो. संघाचे कर्णधार पद सोडल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवत आहे. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. रांचीतील एका धबधब्याखाली धोनी चिंब भिजत असल्याचा व्हिडिओ आहे.
चॉकलेटमधून विष देऊन भावी पतीचा वधूने केला खून

चॉकलेटमधून विष देऊन भावी पतीचा वधूने केला खून

कुटुंबियाच्या संमतीने वधू - वराने एकमेकांना पसंत केले. काही दिवसांमध्येच लग्नाचा बार उडणार होता. पण चार महिन्याआधी वधूची पसंत बदलली. नवरा मुलगा पसंत नसल्याने तिने होणाऱ्या पतीलाच चॉकेलटमधून विष देऊन ठार मारले. या वधूचे नाव समरीन तर वराचे नाव अरकम असे आहे. यातील खळबळजनक बाब म्हणजे ही घटना मृत अरकमच्या मोबाईलवर झालेल्या संभाषणामुळे उघडकीस आली. 
बस झाडाला अडकल्याने 25 प्रवाशांचे प्राण वाचले

बस झाडाला अडकल्याने 25 प्रवाशांचे प्राण वाचले

गडचिरोली जिल्ह्यातील नद्या-नाल्यांवरील छोटे-मोठे पुलही पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, सोमवारी एक एसटी बस एका छोट्या नाल्यावरील पुलावरुन जात असताना नाल्यावरुन वेगाने वाहत असलेल्या पाण्यामुळे थेट पाण्यात गेली आणि वाहू लागली. मात्र, नाल्यात मध्यभागी असलेल्या एका झाडाला ती अडकली. त्यानंतर, परिसरातील लोकांनी बसमधील 25 प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
भारताचा डाव घोषित, इंग्लंडपुढे 521 धावांचे आव्हान

भारताचा डाव घोषित, इंग्लंडपुढे 521 धावांचे आव्हान

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या डाव 7 बाद 352 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी 521 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात पुजारा 72 धावांवर बाद झाला. कोहलीने मात्र शतक ठोकले. हे त्याचे कसोटीतील 23वेशतक ठरले. कोहलीने 103 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या एका तासात हार्दिक पांड्याने तडाखेबाज अर्धशतक (52) ठोकले. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more