Short News

रवि शास्त्रींच्या फिटनेसवर हर्ष गोएंकांची टीका

रवि शास्त्रींच्या फिटनेसवर हर्ष गोएंकांची टीका

गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेस वर जास्त भर दिला आहे. वादग्रस्त यो-यो टेस्टचा अवलंब त्याचाच एक भाग आहे. या यो-यो टेस्टला भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा पूर्णपणे पाठींबा आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत जागरुक असणारे शास्त्री आता मात्र त्यांच्या फिटनेसवरुन ट्रोल झाले आहेत. हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर शास्त्रींच्या फिटनेसवर खोचकपणे टीका केली आहे. 
पूरग्रस्त केरळसाठी पुण्यातून पिण्याचे पाणी

पूरग्रस्त केरळसाठी पुण्यातून पिण्याचे पाणी

केरळमधील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. या पुरात ३२४जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमधील पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्रातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी पाठवले जाणार. पुरामुळे केरळमधील नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार.
नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या समर्थकांचा मोर्चा

नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या समर्थकांचा मोर्चा

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वैभव राऊत याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्थानिकांकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्थानिकांनी एटीएसच्या कारवाईचा निषेध केला. वैभव ज्या परीसरात रहातो त्याच्या भंडार आळी परीसरातील लोकांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चात अनेक हिंदू संघटनांनीही सहभाग घेतला. भंडार आळी परिसरातून निघालेल्या या मोर्चाची सांगता नालासोपारा बस स्थानकात झाली.
वाजपेयींनी श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला अटक

वाजपेयींनी श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला अटक

अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे औरंगाबाद महानगरपालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली होती. यानंतर मतीन यांच्या समर्थकांनी महापालिकेच्या परिसरात प्रचंड धिंगाणा घातला होता. याप्रकरणी शनिवारी पोलिसांकडून मतीन यांना अटक करण्यात आली. महापालिकेच्या विशेष सभेत शिवसेनच्या राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more