Short News

ऋषभ पंतला स्लेज करणाऱ्या ब्रॉडला विराटचं मैदानातच प्रत्युत्तर

ऋषभ पंतला स्लेज करणाऱ्या ब्रॉडला विराटचं मैदानातच प्रत्युत्तर

ब्रॉडनं पंतला केलेल्या स्लेजिंगचा बदला विराट कोहलीनं मैदानातच घेतला. दुसऱ्या इनिंगमध्ये ब्रॉड बॅटिंग करायला आला तेव्हा विराट कोहली भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला आणखी जलद बॉलिंग टाकण्यासाठी प्रोत्साहन देत होता. यानंतर ब्रॉडनंही हे खूप आक्रमक असल्याची प्रतिक्रिया दिली. मग तरुण मुलाला लक्ष्य केलं तर त्याचं उत्तर असंच मिळेल, असं सडेतोड प्रत्युत्तर विराटनं स्टुअर्ट ब्रॉडला दिलं.
Jio Phone 2 वर कॅशबॅक ऑफर, फ्लॅशसेल सुरू

Jio Phone 2 वर कॅशबॅक ऑफर, फ्लॅशसेल सुरू

JioPhone 2 खरेदी करण्याची ग्राहकांकडे आज आणखी एक संधी आहे. आज दुपारी 12 वाजेपासून jio.com वर या फोनसाठी फ्लॅशसेल सुरू झाला आहे. JioPhone 2 चा हा पाचवा सेल आहे. पेटीएमद्वारे हा फोन खरेदी केल्यास 200 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. तसेच कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय (COD) देखील ग्राहकांसमोर आहे. हा फ्लॅशसेल असल्यामुळे मर्यादीत फोनचीच विक्री होण्याची शक्यता आहे. 
भेटीसाठी इम्रान खान यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

भेटीसाठी इम्रान खान यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न आणि इतर प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत,अशी विनंती इम्रान खान यांनी मोदींना पत्रात केली आहे. दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बैठक व्हावी, यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे आग्रह धरला आहे.
गोंदियामध्ये पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गोंदियामध्ये पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कोसबी या जंगलात आज सकाळी 10 च्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान पोलीस व नक्षल्यामध्ये चकमक झाली. या चकमकीच्या वेळी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक शोध मोहिमेत सहभागी असल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्हा हा नक्षल क्षेत्र आहे. येथे नुकतेच एका महिला नक्षलीने गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.  
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more